Dainik Maval News : लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून आर्थिक व्यवहारातील प्रकरणात तपासादरम्यान लाच मागितली होती.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २५ हजारांची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. शकील मोहम्मद शेख (४५) असे अटक केलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी शेख यांनी ४२ वर्षीय व्यक्तीकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान नारायणीधाम पोलीस चौकीत सापळा लावला. यामध्ये शेख यांनी तक्रारदार व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी (२९ सप्टेंबर) रोजी पुन्हा सापळा लावला असता शेख यांना तडजोड करून २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल

