Dainik Maval News : राज्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)’ पदावर नियुक्ती देण्यासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही स्पर्धा परीक्षा १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात भरावयाची ही पदे एकूण २ हजार ४१० इतकी आहेत.
या स्पर्धा परीक्षेसाठी सन २०२३ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ८ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत आपल्या अर्जात दुरूस्ती करता येईल. नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा राहील.
परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक, ऑनलाईन आवेदनपत्राबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल