Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ यांच्या वतीने जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच पुणे पीपल्स को-ऑफ बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
बाळा भेगडे म्हणाले की, शिक्षक आपल्या ज्ञानाने अनुभवाने आणि मार्गदर्शनाने नव्या पिढीला घडवतो संस्कार देतो आणि त्यांच्या स्वप्नांना गती देतो. यावेळी संतोष भेगडे, शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला काळे निलेश काशिद,महेश शेलार, गुलाबराव गवळे यांनीही मनोगते व्यक्त केली.
शिक्षकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार तसेच गुलाबराव गवळे यांनी विशेष कार्यगौराव सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संतोष भेगडे, अरुण माने, चंद्रजीत वाघमारे, गुलाबराव गवळे, निलेश काशिद, महेश शेलार, रामदास अभंग, शरद भोंगाडे, अमित भसे, राजेंद्र भांड, धनकुमार शिंदे, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष राम कदमबांडे, देवराम पारीठे, अशोक कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम कदमबांडे यांनी केले, सुत्रसंचलन भारत काळे, वैशाली कोयते यांनी केले, आभार समीर भेगडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास भेगडे, धनंजय नांगरे, नारायण असवले, पांडुरंग पोटे, संभाजी बोऱ्हाडे, बाळासाहेब पाचारणे, लक्ष्मण मखर, भाऊसाहेब खोसे, भारत काळे, सोपान असवले, संदिप क्षीरसागर, कोषाध्यक्ष गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, सहकार्यवाह रियाज तांबोळी, संघटनमंत्री श्रीनिवास गजेंद्रगडकर,संजय हुलावळे, समीर गाडे, संतोष बारसकर, सुनिल मंडलिक,नरेंद्र इंदापूरे, संपत गोडे, गणेश दातीर, दिलीप पोटे, दिनेश टाकवे,बळीराम भंडारी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल