Dainik Maval News : मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) यांच्यातील राजकीय द्वंद आता सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यांची परिस्थितीवरून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकावल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.
गोडुंबरे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपा कार्यकर्ता विकास घारे यांनी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती. त्या पोस्टवर किशोर सावंत या युवकाने उत्तरादाखल टिप्पणी केली. त्यानंतर घारे आणि सावंत यांच्यात वाकयुद्ध झाले. परंतु त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे नेते नितीन मराठे यांचे नाव असल्याने त्यांनी याबाबत किशोर सावंत यांच्या घरी जात त्यांना विचारणा केली, परंतु याबाबत किशोर सावंत यांनी शिरगाव पोलिसांत तक्रार दिली असून आपणास धमकावल्याचे म्हटले आहे.
याबाबत किशोर सावंत यांनी शिरगाव – परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, किरकोळ कारणावरून नितीन मराठे व त्यांच्या साथीदारांनी सावंत यांच्या जाऊन शिवीगाळ करीत, दमदाटी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे मावळातील राजकीय परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, याबाबत नितीन मराठे यांची प्रतिक्रिया घेतली असता, किशोर सावंत यांनी फेसबुकवर माझे नाव टाकून कमेंट केली व कारण नसताना बदनामी केली. याप्रकरणी मी शिरगाव पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत मला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झालेत. परंतु मायबाप जनतेला माझ्यावर विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. परंतु यातून सामान्य कार्यकर्त्यांत तू-तू मैं-मैं होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल