व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, January 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

युवकाला धमकावल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या विरोधात शिरगाव पोलिसांत तक्रार दाखल । Maval News

किशोर सावंत यांनी याबाबत शिरगाव - परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 4, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Former Zilla Parishad member Nitin Marathe in trouble case registered for threatening a youth shirgaon police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) यांच्यातील राजकीय द्वंद आता सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यांची परिस्थितीवरून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकावल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

गोडुंबरे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपा कार्यकर्ता विकास घारे यांनी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती. त्या पोस्टवर किशोर सावंत या युवकाने उत्तरादाखल टिप्पणी केली. त्यानंतर घारे आणि सावंत यांच्यात वाकयुद्ध झाले. परंतु त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे नेते नितीन मराठे यांचे नाव असल्याने त्यांनी याबाबत किशोर सावंत यांच्या घरी जात त्यांना विचारणा केली, परंतु याबाबत किशोर सावंत यांनी शिरगाव पोलिसांत तक्रार दिली असून आपणास धमकावल्याचे म्हटले आहे.

याबाबत किशोर सावंत यांनी शिरगाव – परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, किरकोळ कारणावरून नितीन मराठे व त्यांच्या साथीदारांनी सावंत यांच्या जाऊन शिवीगाळ करीत, दमदाटी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे मावळातील राजकीय परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, याबाबत नितीन मराठे यांची प्रतिक्रिया घेतली असता, किशोर सावंत यांनी फेसबुकवर माझे नाव टाकून कमेंट केली व कारण नसताना बदनामी केली. याप्रकरणी मी शिरगाव पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत मला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झालेत. परंतु मायबाप जनतेला माझ्यावर विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. परंतु यातून सामान्य कार्यकर्त्यांत तू-तू मैं-मैं होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल 


Previous Post

तळेगाव नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांना मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती । Shilpa Rodge

Next Post

‘आधी तोरण राजांच्या गडाला, मग माझ्या दाराला’ ; तिकोणा किल्ल्यावर विजयादशमी उत्साहात साजरी । Tikona Fort

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
First Toran to fort Vijayadashami celebrated with enthusiasm at Tikona Fort Maval

'आधी तोरण राजांच्या गडाला, मग माझ्या दाराला' ; तिकोणा किल्ल्यावर विजयादशमी उत्साहात साजरी । Tikona Fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 Zero nomination papers filed in Maval 115 applications sold

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळात अद्याप एकाही उमेदवाराकडून अर्ज दाखल नाही, शेवटचे दोन दिवस बाकी

January 19, 2026
Inauguration of new hostel for children at Ashram School run by Sevadham Trust in Malegaon Khurd Maval

माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेत मुलांच्या नूतन वसतीगृहाचे उद्घाटन ; आमदार सुनील शेळकेंची उपस्थिती

January 19, 2026
NCP has no proposal for alliance there is no alliance with NCP in Maval Bala Bhegde gives full stop to alliance

राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप

January 19, 2026
Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 Maha Vikas Aghadi will field candidates for all seats in Maval

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात महाविकासआघाडी सर्व पंधरा जागांवर उमेदवार देणार

January 19, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी : इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात

January 18, 2026
Political earthquake in Induri-Varale Zilla Parishad group Prashant Bhagwat Megha Bhagwat bid farewell to NCP

इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

January 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.