राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारी (12 डिसेंबर) रोजी 82वा वाढदिवस होता. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने लोणावळा येथे भव्य राज्यस्तरीय महिला आणि पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. रविवार रोजी झालेल्या ‘शरदचंद्रजी श्री-2022’ या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना मान्यनरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. ( State Level Bodybuilding Competition At Lonavla Maval On Occasion Of Sharad Pawar Birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, भरत येवले, बाळासाहेब भानुसघरे, राजू बोराटी, लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, भरत हरपुडे, जीवन गायकवाड, रवी पोटफोडे, उमा मेहता, श्रीमती मंजुताई वाघ, वत्सला वाळंज, बाळासाहेब पायगुडे, राजू बच्चे, निखिल कविश्वर, नारायण पाळेकर, विनोद होगले, अजिंक्य कुटे, धनंजय काळोखे, आदित्य पंचमुख, धवल चौहान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’
– आरटीओ अधिकाऱ्यांचे, एक पाऊल पुढे! सहलीला निघालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची बसमध्येच घेतली ‘शाळा’