Dainik Maval News : युनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी “अमृत दुर्गोत्सव २०२५” हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
युनेस्कोने घोषित केलेल्या १२ दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करून, त्या प्रतिकृतीसोबतचा सेल्फी https://www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. या लोकोत्सवाद्वारे शिवछत्रपतींच्या दुर्गांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेतून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे.
या सर्व छायाचित्रांचे संकलन करून “अमृत” (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) विश्वविक्रम नोंदणीसाठी सादर करणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीसह अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे.असे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा