Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर एका भरधाव कार चालकाने धडक दिल्याने अन्य वाहनात असलेल्या एका 78 वर्षीय व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ दवारकाप्रसाद शर्मा ( वय ४९ वर्षे रा. सिंधुनगर, प्राधिकरण निगडी पुणे ) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी आरोपीत चालकावर शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), १२५ (ए), १२५ (बी), ३२४ (४) महाराष्ट्र मोटार वाहन अधि. १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत नाही.
याप्रकरणी अख्तर सरावर खान ( वय ३६ वर्षे , व्या. ड्रायव्हर , सध्या राह. कल्याण ईस्ट कल्याण, जि. ठाणे ) यांनी शिरगाव – परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे वर गहुंजे गावच्या हद्दीत कि.मी. नं. ९१/८५० जवळ हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ताब्यातील अशोक लेलंड वाहन ( क्र. एन.एल. ०१ / ए.इ. ३९५५ ) हे मुंबई ते पुणे बाजुकडे चालवित घेवून जात असताना आरोपी याने त्याचे ताब्यातील सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर ( क्रं. एम. एच. १४ एच. डी ६७८१ ) ही हयगयीने, अविचाराने, भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या वाहनास मागून धडक दिली.
या अपघातात द्वारकाप्रसाद लाडुराम शर्मा ( वय ७८ वर्षे, रा. सिंधुनगर, प्राधिकरण निगडी ) हे गंभीर दुखापती होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोउपनि शेख हे अधिक तपास करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
