Dainik Maval News : ऐन दिवाळीत तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे पंपिंग स्टेशन येथील एक्स्प्रेस फीडरचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाल्याने पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅकप्रेशर निर्माण झाले. या तीव्र दाबामुळे सोमाटणे पंपिंग स्टेशनवरील २० इंची मुख्य दाबनलिकेचा मेन व्हॉल्व जागीच पूर्णपणे तुटला असून पाईपलाइनला देखील हानी पोहोचली आहे.
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम सुरू असून त्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा बंद राहणार भाग ;
1. तुकाराम नगर
2. संपूर्ण कॉलनी परिसर
3. गाव भाग
4. स्टेशन परिसर
5. वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटल दरम्यानचा परिसर
नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे, अशी विनंती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल




