Dainik Maval News : मावळ तालुक्यातील इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील नवलाख उंब्रे परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींचा दौरा सुरू असून त्यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नवलाख उंब्रे गावात झालेल्या भेटीगाठींमध्ये वडीलधारी मंडळी, माता भगिनींनी मेघाताईंचे मनःपूर्वक स्वागत केले. “आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादामुळे मेघाताई स्वतः भावुक झाल्या.
यावेळी बोलताना मेघाताई भागवत म्हणाल्या, “जनतेचं हे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. या ऊर्जा आणि आशीर्वादाच्या बळावर मी अधिक जोमाने काम करीन.”
गावागावांत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताई भागवत यांच्यासाठी एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
निवडणुकीच्या तयारीत त्या ज्या पद्धतीने जनतेच्या मनात घर करत आहेत. त्यावरून इंदोरी-वराळे गटात यंदा त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी
