Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ( दि. 30 ) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत सन २०२५ ते २०३० सालाकरिता संस्थेच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी नंदकुमार शेलार, खजिनदारपदी राजेश म्हस्के व सहसचिवपदी विनायक अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे नियामक मंडळ खालीलप्रमाणे :
संजय उर्फ बाळा विश्वनाथ भेगडे – अध्यक्ष
नंदकुमार आण्णासाहेब शेलार – उपाध्यक्ष
संतोष दत्तात्रय खांडगे – सचिव
राजेश राजाराम म्हस्के – खजिनदार
विनायक दामोदर अभ्यंकर – सहसचिव
गणेश वसंतराव खांडगे – संचालक
रामदास महादेव काकडे – संचालक
चंद्रकांत दामोदर शेटे – संचालक
यादवेंद्र दत्तात्रय खळदे – संचालक
संस्थेच्या सल्लागार पदी खालील सभासदांची एकमताने निवड करण्यात आली,
दामोदर तुकाराम शिंदे
महेश चंदुलाल शहा
सोनबा नागुजी गोपाळे
वसंत कृष्णाजी भेगडे
शंकर दामोदर नारखेडे
संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची उत्तरोतर प्रगती करत असताना, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सर्व भौतिक सुविधा देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक पणे प्रयत्न करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.
प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या २४ कार्यरत विद्याशाखांच्या प्रगतीची माहिती दिली. भविष्यकाळात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या गरजा ओळखुन संस्थेमध्ये नवनवीन विद्याशाखा सुरु करण्याचा व संस्थेचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. तर आभारप्रदर्शन सहसचिव विनायक अभ्यंकर यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी
