लम्पी स्कीन (चर्मरोग) ( Lumpy Skin Disease ) नावाच्या आजाराने आता महाराष्ट्रातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यातही ( Maval Taluka ) हा आजार पसरताना दिसत असून पशुवैद्यकीय विभागाकडून गावोगावी लम्फी ( Lumpy ) आजारापासून बचाव व्हावा यासाठी पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण ( Lumpy Skin Disease Preventive Vaccination ) करण्यात येत आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून तातडीने 10 हजार लम्फी लसींचा पुरवठा
पशूधनांमध्ये गाय, म्हैस, बैल इ. जनावरांना लम्फीची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संसर्गजन्य आजाराबाबत पशुसंवर्धन आयुक्त मुकणे यांच्याशी संपर्क साधून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegde ) यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लंपी लसीचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती अभिमन्यू शिंदे यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लम्फी संसर्ग वेळीच रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शेतकऱ्यांच्या गोठ्यात सध्या लसीकरण सुरु आहे. वेळीच लसीकरण केले तर या आजाराचा होणारा संसर्ग टाळता येईल. मंगळवारी (13 सप्टेंबर) राजपुरी येथील शेतकऱ्यांच्या पशुधनाला लम्फी लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, राजाराम असवले, विठ्ठल तुरडे आदी उपस्थित होते. ( Lumpy Skin Disease 10 Thousand Vaccines Immediately Available For Maval Taluka Through Ex MLA Bala Bhegde )
अधिक वाचा –
मावळ तालुक्यात पसरतोय हा भयंकर आजार, शेतकरी प्रचंड चिंतेत, उर्से गावात कहर
लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण