Dainik Maval News : राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. तसेच २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणताही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. तसेच आज राज्यात उर्वरित नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते, परंतु आता या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.
निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबत कोर्टाने आज निकाल दिला आहे. दरम्यान, आज होणाऱ्या मतदानाचे सर्व ईव्हीएम मशिन २१ तारखेपर्यंत ठेवावे लागणार आहेत. यामुळे प्रशासनावर ताण येणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

