Dainik Maval News : देहूरोड पोलिसांनी किवळे ब्रीज येथे मुंबई-बंगळुरू हायवे लगत वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने उभ्या राहिलेल्या महिलांवर कारवाई केली. एकूण चार महिला आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
किवळे ब्रीज, मुंबई – बंगळुरू हायवे रोड, द्वारका लॉज शेजारील मोकळ्या जागेत ही कारवाई (दि. 28 ) करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी फिर्याद दिली असून चार महिलांवर गुन्हा दाखल आहे. आरोपी महिला या वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने, लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून, सार्वजनिक ठिकाणी येणारे-जाणारे लोकांना अडथळा निर्माण करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तळेगाव, वडगाव ठाण्याचे पोलीस कधी जागे होणार?
दरम्यान वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत देखील जुन्या पुणे – मुंबई महामार्गालगत दररोज राजरोसपणे वेश्या व्यावसाय करण्याच्या उद्देशाने महिला उभ्या असतात. सायंकाळनंतर तर अशा महिलांची संख्या अधिक वाढते. ही नित्याची बाब असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना, सामान्य नागरिकांनाही याचा त्रास होतो. परंतु पोलिसांचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल


