Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेत यंदा महिला मतदारांची मतदानात आघाडी दिसून आली.
निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार लोणावळ्यात १७,१६२ पुरुषांनी मतदान केले, तर १७,३४९ इतक्या महिला भगिनींनी मतदानाचा अधिकार बजाविला. याचा अर्थ यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक ठरणार आहे.
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एकूण मतदारांपैकी ३४,५११ मतदारांनी मतदान केले. एकूण ७१.३४ टक्के इतके मतदान झाले. दरम्यान लोणावळ्यात एकूण दोन नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी मतदान बाकी असून ते २० तारखेला होणार आहे. तर, एकत्रित २१ तारखेला निकाल जाहीर होणार आहे,
लोणावळा नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय मतदान
प्रभाग क्रमांक – एकूण मतदान – टक्केवारी
प्रभाग १ – २३२५ – ७९.३७ %
प्रभाग २ – २३६३- ८३.२० %
प्रभाग ३ – २५६७ – ७१.४४ %
प्रभाग ४ – २५५२ – ६८.८६ %
प्रभाग ५ – २४३६ – ७४.०४ %
प्रभाग ६ – २६३२ – ७१.३२ %
प्रभाग ७ – २५८१ – ६६.५२ %
प्रभाग ८ – २९३६ – ६२.६६ %
प्रभाग ९ – ३०८५ – ६७.७२ %
प्रभाग १० – २००३ – ६२.६५ %
प्रभाग ११ – ३१६३ – ७७.४२ %
प्रभाग १२ – २१८९ – ६९.९१ %
प्रभाग १३ – ३६७९ – ७६.७७ %
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात

