Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी हरविलेले आणि चोरीला गेलेले असे एकूण ३५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द केले आहेत.
लोणावळा शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फोन चोरीला जाणे किंवा गहाळ होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फोन गहाळ झाल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करत अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा गैरप्रकार होण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल आहे. तांत्रिक तपास, सीडीआर विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि सततच्या पाठपुराव्यानंतर हे मोबाईल दुसऱ्या सिमकार्डसह वापरले जात असल्याचे समोर आले. यानंतर राज्यासह परराज्यातून ३५ मोबाईल फोन पोलिसांकडून जप्त करण्यात आले.
हरविलेला मोबाईल परत मिळेल अशी खात्री नागरिकांमध्ये नसते. मात्र हे मोबाईल त्याच्या मूळ मालकांना सुपूर्द करत पोलिसांनी सुखद धक्का दिला. मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात

