Dainik Maval News : विमान प्रवासातील आघाडीची कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या सेवेत व्यत्य आला असून शेकडो विमानउड्डाणे दररोज रद्द होत आहेत. इंडिगोच्या नेटवर्कमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी व वेळापत्रकातील बिघाडामुळे अनेक उड्डाणे रद्द होत असून याचा फटका जसा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे, तसाच तो शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसला आहे.
मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मोठा फटका बसला आहे. मावळ तालुक्यातील मोठ्या प्रमाणात फूल उत्पादक शेतकरी असून या फूल उत्पादक शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी आपल्या फुलांची परदेशात निर्यात करतात. अशा सर्व फूल उत्पादकांचा शेतमाल अर्थात फुले मोठ्या प्रमाणात विमानतळावर पडून आहेत. फूल हे नाशिवंत असल्याने ठराविक वेळेत त्यांची विक्री न झाल्यास नुकसान सोसावे लागते, आणि सद्य परिस्थितात हे नुकसान मावळातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.
मावळ तालुक्यातील गुलाबांना परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, त्यामुळे निर्यात होत असते. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने फुलांना मागणी चांगली आहे. परंतु वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दररोज देशभरातील बाजारपेठांमध्ये विमानाने जाणारी लाखो फुले, तसेच परदेशात जाणारी फुले विमानतळावरच पडून आहेत. दररोज मावळातून सुमारे 40 लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यापैकी सुमारे १० लाख गुलाब फुले एकट्या विमानाने विविध शहरांमध्ये जातात. किरकोळ बाजारात एका गुलाबाला २० रुपयांपर्यंत भाव मिळत असताना, वाहतूक थांबल्याने गेल्या पाच दिवसांत सुमारे ५० लाख रुपयांचे फुलांचे नुकसान झाले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
