व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 10, 2025
in लोकल, शहर
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वडगाव कमानी जवळ एक अवजड वाहन बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, तसेच एकूण तीन ठिकाणी वाहने बंद पडल्याची माहिती समोर येत आहे.

Novel NIBR Ads

वडगाव कमानी जवळ तळेगाव एमआयडीसी कडे जाण्यासाठी युटर्न असल्याने या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच यूटर्न असलेल्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून अशा परिस्थितीतही अवजड वाहने वेगाने वळण घेत असतात. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अचानक थांबावे लागते, यातून कधीकधी लहान-मोठे अपघातही होत असतात.

तसेच अवजड वाहने या ठिकाणी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. बुधवारी सकाळी अशाच पद्धतीने अवजड वाहन बंद पडल्यामुळे साधारण दीड किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. सकाळच्या सत्रात किंबहुना साधारणताः या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहतूक पोलीस व्यवस्था उपलब्ध नसते. मात्र तळेगाव फाट्यावर वाहतूक पोलीस उपलब्ध असतात. त्यामुळेच वडगाव कमानी जवळ देखील नित्यनेमाने वाहतूक पोलीस असावेत, अशा पद्धतीची मागणी जोर धरत आहे.

तसेच या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे, रस्त्याची परिस्थिती सुधारावी अशी मागणी देखील होत आहे. वडगाव मधून मुंबई-पुणे हायवेवर जाणाऱ्या वाहन चालकांनाही मूळ रस्त्यावर वाहन आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. तर या ठिकाणाहून रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो, या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

Next Post

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.