Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वडगाव कमानी जवळ एक अवजड वाहन बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, तसेच एकूण तीन ठिकाणी वाहने बंद पडल्याची माहिती समोर येत आहे.
वडगाव कमानी जवळ तळेगाव एमआयडीसी कडे जाण्यासाठी युटर्न असल्याने या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच यूटर्न असलेल्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून अशा परिस्थितीतही अवजड वाहने वेगाने वळण घेत असतात. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अचानक थांबावे लागते, यातून कधीकधी लहान-मोठे अपघातही होत असतात.
तसेच अवजड वाहने या ठिकाणी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. बुधवारी सकाळी अशाच पद्धतीने अवजड वाहन बंद पडल्यामुळे साधारण दीड किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. सकाळच्या सत्रात किंबहुना साधारणताः या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहतूक पोलीस व्यवस्था उपलब्ध नसते. मात्र तळेगाव फाट्यावर वाहतूक पोलीस उपलब्ध असतात. त्यामुळेच वडगाव कमानी जवळ देखील नित्यनेमाने वाहतूक पोलीस असावेत, अशा पद्धतीची मागणी जोर धरत आहे.
तसेच या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे, रस्त्याची परिस्थिती सुधारावी अशी मागणी देखील होत आहे. वडगाव मधून मुंबई-पुणे हायवेवर जाणाऱ्या वाहन चालकांनाही मूळ रस्त्यावर वाहन आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. तर या ठिकाणाहून रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो, या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
