Dainik Maval News : काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे इच्छुक अन् प्रभावी उमेदवार असलेले दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या माध्यमातून काले गणातील महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अप्सरा आली फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीमुळे महिला भगिनींचा आनंद द्विगुणीत झाला होता.
दत्ताभाऊ गुंड युवा मंच मावळ आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्याकडून आयोजित खेळ रंगला पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा खास कार्यक्रम मंगळवारी (दि. 16 डिसेंबर) रोजी सायंकाळी येळसे ( ता. मावळ ) येथील शहीद कांताबाई ठाकूर मैदान याठिकाणी संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढली होती.
सोबत भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे प्रमुख नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र आप्पा भेगडे तालुक्यातील आणि परिसरातील भाजपाचे अन्य मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक गावचे आजी-माजी सरपंच, विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी देखील आवर्जुन उपस्थित होते. अतिशय नियोजनबद्धरित्या हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात परिसरातील यशस्वी महिला भगिनींचा उचित सन्मान करण्यात आला.
तसेच, विजेत्या महिलांना दुचाकी आणि अन्य बक्षीसांचे वाटप करण्यात आले. सहभागी महिला भगिनींसाठी खास गिफ्ट म्हणून साडी देखील देण्यात आली. तसेच दुचाकी, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, शिलाई मशीन, मिक्सर अशी अनेक बक्षीसांचे वाटप विजेत्या महिलांना करण्यात आले. अतिशय आनंदात आणि उत्साहात बहा कार्यक्रम संपन्न झाला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

