Dainik Maval News : देहू ते येलवाडी या दोन किलोमीटर रस्त्याचे अखेर काँक्रिटीकरण होणार आहे. याबाबतचा कार्यारंभ आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यकारी अभियंता वसंत नाईक यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे हे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वरील देहू फाटा ते येलवाडीमार्गे श्री क्षेत्र देहू या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. देहू फाटा ते येलवाडी गाव प्रवेशद्वार या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सतत छोटे, मोठे अपघात आणि वाहतूक कोंडी होत आहे.
सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदने आणि विनंत्यासह पाठपुरावा केला. त्याची दखल घेत ‘पीएमआरडीए’ने जुलैमध्ये या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रक्रिया रखडल्याने कृती समितीने सप्टेंबरमध्ये येलवाडी येथे उपोषणदेखील केले होते. अखेर या कामाला आता मुहूर्त मिळाला आहे.
मोशी येथील व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रा. लि. या कंपनीने १९ टक्के कमी दराने निविदा भरली होती. तिचा स्वीकार करून प्रशासनाने स्वीकृत निविदा रक्कम ५९ कोटी ६७ लाख २७ हजार रुपयांचा कार्यादिश जारी केला आहे.
दोन किलोमीटर रस्त्याचे ३० मीटर रुंदीने काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा मुदत १२ महिने असून, देखभाल दुरुस्ती कालावधी कालावधी १५ वर्षे इतका असणार आहे. गेले काही महिने रखडलेल्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याने स्थानिकांसह, एमआयडीसी कामगार आणि कृती समिती पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime
