Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या चार प्रभागांतील पाच जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहपूर्ण वातावरणात मतदारांनी आपला हक्क बजावला.
अनेक उमेदवारांनी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचे दर्शन घेऊन सकाळीच मतदान केले. महायुती तसेच अपक्ष उमेदवारांकडून विविध ठिकाणी बूथ उभारण्यात आले होते. सकाळी नऊ वाजल्यानंतर बुथवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. मतदारांचे नाव, मतदान क्रमांक व मतदान केंद्र शोधून देण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली. सायंकाळी मतदान संपेपर्यंत एकूण 57.43 टक्के मतदान झाले.
तळेगाव नगरपरिषदेत एकूण १४ प्रभागांतील २८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून दोन डिसेंबर रोजी चार प्रभागांतील तसेच नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले होते. यानंतर शनिवारी मतदान झालेले प्रभाग क्रमांक २ अ (सर्वसाधारण महिला), क्र. ७ ब (सर्वसाधारण), क्र. ८ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला), क्र. ८ ब (सर्वसाधारण), क्र. १० ब (सर्वसाधारण महिला) हे असून एका जागेचा निकाल न्यायप्रविष्ठ आहे.
शहरातील २८ पैकी १९ जागा बिनविरोध झाल्या असून नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून संतोष दाभाडे, अपक्ष किशोर भेगडे, रंजना भोसले रिंगणात होते. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने ती कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत निकालाकडे लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरवात होणार असून, साधारण दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

