Dainik Maval News : नाताळ सण, नूतन वर्षाचे स्वागत करणे याकरिता जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा योग साधण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडले आहे. यामुळे गुरुवारी मुंबई – पुणे एक्सप्रेस वे आणि पुणे – मुंबई महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने येऊन जागोजागी वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेषतः लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात वाहनांच्या ५ ते ७ किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचा संयम सुटल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती.
खंडाळा घाटातील अरुंद वळणे, उताराचे रस्ते आणि एखादे जरी किरकोळ वाहन बंद पडले तरी लगेच संपूर्ण वाहतूक विस्कळीत होत असल्याचे अनुभवास आले. अनेक प्रवाशांना एक तासाहून अधिक काळ वाहनातच थांबावे लागले. या कोंडीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला प्रवाशांना बसला.
काही ठिकाणी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहने उभी करून पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. परिणामी, समाजमाध्यमांवर “हा मार्ग टाळा” असे आवाहन करणारे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश


