Dainik Maval News : काँग्रेस (आय) पार्टीचे जुणे नेते आणि लोणावळा शहरातील प्रमुख नेते असलेले निखिल कविश्वर तसेच राजू गवळी यांचे काँग्रेस ( आय ) पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत निखिल कविश्वर आणि राजू गवळी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) या पक्षाची साथ दिली होती, त्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतच्या कारवाईचे पत्र पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ पाठविले आहे. या पत्रात, लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव निखिल कवीश्वर आणि लोणावळा ब्लॉकचे प्रभारी अध्यक्ष राजू गवळी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे सांगितले आहे.
काय आहे पत्र?
“नुकत्याच पार पडलेल्या लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निखिल कवीश्वर, माजी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि राजू गवळी, प्रभारी अध्यक्ष लोणावळा काँग्रेस कमिटी यांनी लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला असून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवारास पक्षाचा एबी फॉर्म वेळेत न दिल्याने त्यांना अध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी वंचित राहावे लागले आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक लढवीत आलेली नाही. या निवडणुकीच्या काळात महायुतीच्या घटक पक्षास पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या काही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बाजूने प्रचार न करता विरोधी पक्षाच्या बाजूने खुला प्रचार केला, ही बाब पक्षविरोधी असून त्यांनी पक्षाचे ध्येय व धोरण कुठेही अवलंबिले नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र मध्ये काँग्रेस कमिटी यांनी सुद्धा सूचना दिली आहे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, त्यानुसार निखिल धनंजय कविश्वर आणि राजू गवळी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत आहे.”
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या सहीनिशी हे पत्र दिले, हे पत्र तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांना पाठविले आहे. तसेच पत्र जारी केल्यापासून निलंबन झाल्याचे समजावे, असे पत्रात म्हटले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

