Dainik Maval News : स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 तर्फे तळेगाव दाभाडे शहरातील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आल्या. कचऱ्याचे प्रकार, स्वच्छतेच्या सवयी, प्लास्टिक बंदी, कचरा पुनः प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले आणि प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना कापडी पॉकेट आणि पेन भेट देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक राम साठे सर यांनी विद्यार्थ्यांना कचरा – व्यवस्थापनाचे महत्त्व, कचऱ्याचे प्रकार, ओला-सुका कचरा विलगीकरण, पुनर्वापर, पुनर्चक्रण तसेच ५ आर संकल्पना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या चांगल्या – सवयी अंगीकारून आपण – आपली शाळा, गाव व शहर कसे स्वच्छ आणि सुंदर करू शकतो याचे प्रभावी प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना दाखविले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत कचरा मुक्त तसेच स्वच्छ शहरे ही राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळा, विद्यार्थी व नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरातूनच कचरा विलगीकरण करण्याची सवय लावावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आपले घर, शाळा, गाव, तालुका व जिल्हा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संस्कार लहानपणापासून अंगीकारल्यास स्वच्छ व निरोगी समाज घडेल अशी माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रम तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यासाठी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शहर समन्वयक शुभम चौकटे यांनी प्रत्येक शाळेत जाऊन घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा जनजागृती कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

