Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान तहसीलदार यांच्यासहीत 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी व 2 तलाठी अशा दहा जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. ती कारवाई शुक्रवारी ( दि. २६) रद्द करण्यात आली.
याबाबतचा आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित दहा अधिकाऱ्यांना ते कार्यरत असलेल्या ठिकाणी पुन्हा रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर एकाच वेळी अशा प्रकारे झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण राज्यभरातील महसूल विभागात खळबळ उडाली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेऊन निलंबनाची कारवाई मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला होता.
मंगरूळ गावच्या हद्दीतील अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी थेट मावळचे विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे मधुसूदन बर्गे, रणजीत देसाई, जोगेंद्र कट्यारे तसेच मंडल अधिकारी संदीप बोरकर, माणिक साबळे, रमेश कदम, अजय सोनवणे व तलाठी दीपाली सलगर, गजानन सोनपट्टीवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असल्याचे जाहीर केले होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
