व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व निवासी घरगुती गृहप्रकल्प व सोसायट्यांमध्ये नळजोडणीस वॉटर मीटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 28, 2025
in लोकल, शहर
water meter

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व निवासी घरगुती गृहप्रकल्प व सोसायट्यांमध्ये नळजोडणीस वॉटर मीटर बसविणे सक्तीचे करण्यात आले असून हे वॉटर मीटर विनाशुल्क बसविण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांनी व संबंधित सोसायट्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी केले आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, निर्धारित मुदतीत वॉटर मीटर न बसविणाऱ्या सोसायट्यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात येतील. यासंदर्भात नगरपालिकेतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, अप्पर आयुक्त, पुणे विभाग यांच्या 25 मे 2016 रोजीच्या निर्देशांनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व घरगुती गृहप्रकल्पांमध्ये जलमापक बसविण्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या WP/2342/2022 या रिट पिटीशननुसार शहरातील सर्व सोसायट्यांमधील नळजोडण्यांना वॉटर मीटर बसविणे अनिवार्य आहे. त्यानुसार नगरपरिषदेच्या वतीने संबंधित सोसायट्यांतील नळजोडण्यांना विनाशुल्क वॉटर मीटर बसविण्यात येत आहेत.

नगरपरिषदेकडून येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लवकरात लवकर वॉटर मीटर बसवून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या सोसायट्या वॉटर मीटर बसविण्यास विरोध करतील, त्यांच्या नळजोडण्या तात्काळ खंडित करण्यात येतील, असा इशाराही नगरपालिकेने दिला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी


Previous Post

मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

Next Post

उर्से निर्भया प्रकरण : सोमवारी मावळ बंदची हाक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
band called off keep off band image

उर्से निर्भया प्रकरण : सोमवारी मावळ बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.