Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व निवासी घरगुती गृहप्रकल्प व सोसायट्यांमध्ये नळजोडणीस वॉटर मीटर बसविणे सक्तीचे करण्यात आले असून हे वॉटर मीटर विनाशुल्क बसविण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांनी व संबंधित सोसायट्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी केले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, निर्धारित मुदतीत वॉटर मीटर न बसविणाऱ्या सोसायट्यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात येतील. यासंदर्भात नगरपालिकेतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, अप्पर आयुक्त, पुणे विभाग यांच्या 25 मे 2016 रोजीच्या निर्देशांनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व घरगुती गृहप्रकल्पांमध्ये जलमापक बसविण्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या WP/2342/2022 या रिट पिटीशननुसार शहरातील सर्व सोसायट्यांमधील नळजोडण्यांना वॉटर मीटर बसविणे अनिवार्य आहे. त्यानुसार नगरपरिषदेच्या वतीने संबंधित सोसायट्यांतील नळजोडण्यांना विनाशुल्क वॉटर मीटर बसविण्यात येत आहेत.
नगरपरिषदेकडून येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लवकरात लवकर वॉटर मीटर बसवून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या सोसायट्या वॉटर मीटर बसविण्यास विरोध करतील, त्यांच्या नळजोडण्या तात्काळ खंडित करण्यात येतील, असा इशाराही नगरपालिकेने दिला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

