Dainik Maval News : वृक्षदाई प्रतिष्ठान आणि देहू नगरपंचायत यांच्या वतीने दिनांक २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान वृक्षदाई व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. देहूतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी दिली.
जागतिक तापमानवाढ, ओझोनचा हास, आम्लवृष्टी, सागरी प्रदूषण, नद्यांचे प्रदूषण आणि जैव विविधतेचा झपाट्याने होणारा ऱ्हास या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय समस्यांबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी पर्यावरणीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
सोमवारी (दि. २९) प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘चला वृक्षारोपण करू, निर्सगाशी नाते जोडू’ या विषयावर पुष्प गुंफणार आहे. मंगळवारी (दि. ३०) प्रसिद्ध जलतज्ज्ञ सतीश खाडे हे ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर, तर बुधवारी (दि. ३१) सागर मित्र विनोद बोधनकर हे प्लॅस्टिक कचरा निर्मूलन सहभाग व चळवळ’ यावर व्याख्यान देणार आहेत.
यंदाचा ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली सेवा पुरस्कार’ नाम फाउंडेशन संस्थेस आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्र्स्टचे अध्यक्ष सुनील रासने असणार आहे. तसेच ‘पद्मश्री डॉ. सु. वि. मापूसकर निर्मल सेवा पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशन संस्थेस खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला

