Dainik Maval News : ३१ डिसेंबर २०२५ अर्थात थर्टी फर्स्ट, वर्षाअखेर आणि नुतन वर्ष २०२६ आगमनाचे अनुषंगाने नागरिक मोठ्या प्रमाणात जल्लोष / उत्सव साजरा करीत असतात. अशावेी जल्लोषामध्ये वाहनचालक मद्य प्राशन करुन वाहने वेगात आणि धोकादायकरित्या चालवुन स्वतःचे तसेच इतरांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण करतात, त्यामुळे अशा वाहन चालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने पोलीस सहआयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाहतुक शाखेअंतर्गत असलेल्या १३ वाहतुक विभागांमार्फत पिंपरी-चिंचवड वाहतुक शाखेकडून मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण ४७ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येवून मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. यात नाकाबंदी दरम्यान २२० मोटारसायकलस्वार आणि २० चारचाकी वाहन चालक असे एकुण २४० वाहन चालक मद्य प्राशन करुन वाहन चालवित असताना आढळून आल्याने त्यांच्यावर न्यायालयात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे खटले दाखल करण्यात येत आहेत.
तरीही यापुढे देखील अशाच प्रकारे विशेष मोहीम राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवून होणारी न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे अवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


