Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून दिनांक २० डिसेंबर ते दिनांक २८ डिसेंबर २०२५ पर्यंत विशेष मोहीम राबवून मद्यपान करणारे वाहनचालक तसेच काळी काच असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या सर्व विभागांमध्ये नाकाबंदी पॉईंट लावून तपासणी करण्यात आली.
सदर विशेष मोहिमेदरम्यान मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकुण ३६५ वाहनचालकांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत वाहन चालकांवर मोटार वाहन काययद्यानुसार आवश्यक दंड व पुढील कायदेशिर प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच काळी काच असलेल्या ११५६ वाहनांवर कारवाई करुन १३,८४,००० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचववड पोलीस आयुक्तालय अंतर्गत मद्यपान करुन वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वेळोवेळी ड्रंक अँन्ड ड्राईव्ह कारवाई करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येते. त्याप्रमाणे दारु पिवुन वाहन चालविणारे वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्यावर न्यायालयात गुन्हे/खटले दाखल केले जातात. याअंतर्गत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडुन विशेष मोहीम राबवून मद्यपान करणारे वाहनचालक तसेच काळी काच असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
मद्यप्राशन करुन वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असुन यामुळे अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करुन स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुरक्षित ठेवणेबाबत जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट
