Dainik Maval News : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी १४ एप्रिल रोजी संपन्न करण्याचे निश्चित करण्यात आले असून सामुदायिक विवाह सोहळा समिती २०२६ च्या अध्यक्षपदी अनिल कोद्रे, कार्याध्यक्षपदी खंडुजी काकडे, तर कार्यक्रम प्रमुखपदी संभाजी येळवंडे, उपाध्यक्षपदी सुधीर ढोरे, सचिवपदी कार्तिक यादव, सचिवपदी विनायक लवंगारे, खजिनदारपदी अक्षय बेल्हेकर, सहखजिनदारपदी गणेश झरेकर, प्रसिद्धीप्रमुख पदी केदार बवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, समितीचे मावळते अध्यक्ष अजय धडवले, ज्येष्ठ संचालक अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, सुनील शिंदे, अरुण वाघमारे, विलास दंडेल, विवेक गुरव, सदाशिव गाडे, गणेश विनोदे, शंकर ढोरे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळा समितीची नूतन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. यावेळी, संस्थेचे पदाधिकारी महेश तूमकर, बाळासाहेब तुमकर, अनिकेत भगत, संजय दंडेल, सतीश गाडे, सुहास विनोदे उपस्थित होते.
यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा १४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार असून, यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच, जोडप्यांना संसारपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. १ एप्रिल पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून, नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा उपक्रम गेली १२ वर्षांपासून राबविण्यात येत असून सुमारे २०० जोडपी विवाहबद्ध झाले आहेत.
यावर्षी संपन्न होत असलेला १३ वा सामुदायिक विवाह सोहळा नावीन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून या उपक्रमात मावळ तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील वधू – वरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, समितीचे अध्यक्ष अनिल कोद्रे यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

