सोमवार (दिनांक 19 डिसेंबर) रोजी मावळ तालुक्यातील मोरवे गावात हॅण्ड इन हॅण्ड इंडिया , तळेगाव (दाभाडे) यांच्या ग्राम उत्थान कार्यक्रमांतर्गत शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ( Government social security scheme awareness program in Morve village through Hand in Hand organization )
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरजू लोकांना केंद्र व राज्य शासनातर्फे राबिवल्या जाणाऱ्या विवीध योजनांबाबत जन जागृती करून लाभार्थ्यांच्या पर्यंत आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याचे सरकारी ठिकाण या गोष्टींची जाणीव व पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास सदर कार्यक्रमा मार्फत प्रयत्न करणे हा आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम मावळ तालुक्यातील मोरवे गावातील लोकांनी माहिती देण्यात आली. शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास परमेश्वर कांबळे आणि सतीश थारकुडे यांनी शासकीय योजनेबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाअंतर्गत लोकांना PAN Card, ई- श्रम कार्ड, आरोग्य कार्ड इत्यादी काढून देण्यात आले. ( Government social security scheme awareness program in Morve village through Hand in Hand organization )
View this post on Instagram
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर कांबळे, सारिका शिंदे, मोहन सोनवणे, सतीश थारकुडे, रूपाली गोणते व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून सारिका शिंदे यांनी शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सहभागी ग्रामस्थांचे गावचे सरपंच, उपसरपंच यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– लोकप्रतिनिधी असावा तर असा; अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन राष्ट्रवादीच्या महिला आमदार अधिवेशनाला हजर – व्हिडिओ
– जांभूळ येथील ‘परिक्रमा’ संस्थेचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा, ‘वाटचाल विचारांची’ पुस्तकाचेही प्रकाशन