व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेतर्फे तुंग गावात सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम

केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांबाबत ग्रामीण भागातील नागिरकांमध्ये पुरेशी जाणीव-जागृती नसते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 25, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Hand-In-Hand-NGO

Photo Courtesy : Sarika Shinde


हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव (दाभाडे) आणि सहासंखा (CSR) यांच्या मार्फत मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील तुंग गाव येथे सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांबाबत ग्रामीण भागातील नागिरकांमध्ये पुरेशी जाणीव-जागृती नसते. त्यामुळे पात्र असूनही अनेक नागरिकांना अशा योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशा योजनांबद्दल जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. ( Social Security Scheme Awareness Program At Tung Village Maval Taluka Through Hand In Hand India NGO Organization )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तुंग गावातील सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, ई – श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, संजय गांधी निराधार योजना (वृद्ध, विधवा, विकलांग), प्रधानमंत्री उज्वला योजना, सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री पशुधन विमा योजना, स्कॉलरशिप, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, शिक्षणाचा अधिकार (RTE) व सार्वजनिक वितरण प्रणाली ( राशन स्वस्थ धान्य) इत्यादी विवीध योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

सदर सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये तुंग गावातील 31 नागरिकांनी उपस्थिती नोंदवली, त्यासोबत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सी. आर.पी. सिमा पठारे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर ज. कांबळे, सारिका शिंदे, मलेका अन्सारी, निकिता मोरे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून सारिका शिंदे यांनी गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले. ( Social Security Scheme Awareness Program At Tung Village Maval Taluka Through Hand In Hand India NGO Organization )

अधिक वाचा –

– दुपारची लोकल रेल्वे सेवा पुर्ववत करा, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर आंदोलन
– लोणावळा जवळील वलवण पुलावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
– ‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर खोपोलीजवळ भरधाव ट्रकची धडक, अनेक वाहनांचा अपघात

Next Post

तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
State-Excise-Department

तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.