राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. त्यात मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. ( Election Declared In Nine Gram Panchayat In Maval Taluka Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील सावळा, देवले, भोयरे, शिरगाव, वरसोली, इंदोरी, कुणे नामा, निगडे, गोडुंब्रे या गावांची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठी थेट नागरिकांमधून निवड करण्यात येणार आहे. जोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू असणार आहे. त्यासोबतच या दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठलीही घोषणा उमेदवारांना करता येणार नाही.
पाहा निवडणूक कार्यक्रम ;
18 नोव्हेंबर – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत – उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
5 डिसेंबर – उमेदवारी अर्जांची छाननी
7 डिसेंबर – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
8 डिसेंबर – उमेदवारांना चिन्हाचे वाटप
18 डिसेंबर – मतदान
20 डिसेंबर – मतमोजणी
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणुका : पुणे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती? पाहा पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय यादी
– दोन पोती खरेदी करत अजित पवारांकडून मावळमधील ‘इंद्रायणी भात खरेदी’ उपक्रमाचा शुभारंभ