मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील तुंग गावचे युवा नेते दिनेश पाठारे, रमेश पांगारे, गुरुनाथ शेडगे, मोहसीन शेख आणि अन्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करणाऱ्या या सर्वांचे मावळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी स्वागत केले.
आमदार शेळकेंसह राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, अमोल केदारी, रोहिदास वाघमारे, संतोष राऊत, तुकाराम पाठारे, संदीप पाठारे, राणू खराडे आदी यावेळी उपस्थित होते. ( Public entry Into Nationalist Congress Party Maval Taluka MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिळींब गावचे माजी सरपंच संभाजीराव शिंदे, तसेच माजी चेअरमन जालिंदर ढमाले, अंकूश धनवे, बाजीराव ढमाले, शामराव चोरघे, बाबूराव चोरघे, अंकूश चोरघे, लिलाधर धनवे, मधूकर केदारी, दिपक घोगरे हेही यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार बारणे, बाळा भेगडे यांच्याकडून ओझर्डे हेलिपॅडवर स्वागत
– मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश