Dainik Maval News : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी अपडेट आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल आज (दि. १३ ) वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भात ही पत्रकार परिषद असल्याने या पत्रकार परिषदेत झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या २ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक तर ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आज (दि. १३ ) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोग याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद #जिल्हा_परिषद#पंचायतसमिती #पत्रकार_परिषद #निवडणूक #निवडणूक_आयोग #StateElectionCommission#SEC_Maharashtra pic.twitter.com/hCmsgjYE54
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) January 13, 2026
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर अवघ्या ४८ तासांत राज्य सरकारने आचारसंहिता जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार (दि. १३ जानेवारी) पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होऊ शकते.
५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नसलेल्या १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आयोग आणि राज्य सरकारने हालचालींना वेग दिला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक

