Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी सर्वाधिक चर्चेत असणारा आणि सर्वाधिक स्पर्धा असणारा कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात यंदा भाजपाने कमळ फुलविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी भाजपाने या गटात प्रभावी किंवा भावी नाही तर थेट अनुभवी असा चेहरा उमेदवार म्हणून दिला आहे.
दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून याठिकाणी विकासाचे कमळ नक्की फुलेल, असा विश्वास दत्तात्रय गुंड यांनी दैनिक मावळसोबत बोलताना व्यक्त केला.
दत्तात्रय गुंड हे कुसगांव बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राहिले आहेत. उपसरपंच काळात त्यांनी गावातील पाणीप्रश्न आणि इतर मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या, अनेक योजना आमलात आणल्या. तसेच, श्री. गुंड हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कुसगांव बुद्रुक परिसरात त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्यात भाजपाचे जनसंघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता.
उत्तम जनसंपर्क, सर्वच पक्षातील नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि थेट जनसामान्यांशी जोडलेली नाळ या जोरावर भाऊसाहेब गुंड ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत काले – कुसगांव बुद्रुक गटाचे मैदान मारणार असा विश्वास दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या कार्यकर्त्यांनी ‘दैनिक मावळ’सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
भाऊसाहेब गुंड यांनी काले आणि कुसगांव बुद्रुक या दोन्ही गणांत यापूर्वीच गावभेट संवाद दौरा पूर्ण केला आहे. तसेच, काकडा आरती सोहळ्याच्या निमित्ताने देखील कुसगांव – काले गटातील गावांगावात ते पोहचले होते. सद्यस्थिती कुसगांव – काले गटात सर्वच भागांत भाऊसाहेब गुंड यांचा चेहरा जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून चांगला परिचित झालेला असून त्यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !
– राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी