Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक शुक्रवार (दि. २३) संपन्न झाली. यामध्ये नियोजन समिती वगळता इतर समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाणी समितीवर जीवन गायकवाड, बांधकाम समितीवर सनी दळवी, आरोग्य समितीवर धनंजय काळोखे, शिक्षण समितीवर दीपा अगरवाल, तर महिला व बालकल्याण समितीवर स्वप्ना कदम सभापती असतील. नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष असल्याने भाजपचे देविदास कडू यांची वर्णी लागली.
समित्यांमध्ये सर्व पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळाली. नगरपरिषद सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यासाठी पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू आदी उपस्थित होते. यावेळी सभापतीपदांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. छाननी प्रक्रियेनंतर निवड प्रक्रिया झाली.
समिती सभापती व सदस्यांची नावे :
स्थायी समिती : राजेंद्र सोनवणे (नगराध्यक्ष व सभापती), सनी दळवी, दीपा आगरवाल, धनंजय काळोखे, जीवन गायकवाड, देविदास कडू, स्वप्ना कदम, सनी घोणे, मुकेश परमार, दत्तात्रय येवले.
सार्वजनिक बांधकाम समिती : सनी राम दळवी (सभापती), लक्ष्मी पाळेकर, अनिता आंबुरे, गायत्री रिले, निखिल कवीश्वर, वैशाली मोगरे, सना चौधरी, सुमीत गवळी, सुभाष डेनकर.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : दीपा आगरवाल (सभापती), सोनाली मराठे, श्वेता गायकवाड, अनिता आंबुरे, नयना पैलकर, सुमीत गवळी, अनिल गवळी, रेश्मा पाठारे, सना चौधरी.
स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती : धनंजय वसंत काळोखे (सभापती), वसुंधरा दुर्गे, गायत्री रिले, मुकेश परमार, मंगेश मावकर, सुमीत गवळी, उषा चौधरी, अनिल गवळी, सुभाष डेनकर.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : जीवन गायकवाड (सभापती), मंगेश मावकर, आरती तिकोणे, सोनाली मराठे, श्वेता गायकवाड, अनिल गवळी, मुबिन इनामदार, वैशाली मोगरे, रेश्मा पाठारे.
नियोजन आणि विकास समिती : देविदास कडू (सभापती), मंगेश मावकर, सनी घोणे, निखिल कवीश्वर, अनिता आंबुरे, श्वेता गायकवाड, अनिल गवळी, मुबिन इनामदार, सुमीत गवळी.
महिला व बालकल्याण समिती : स्वप्ना अतुल कदम (सभापती), भाग्यश्री जगताप (उपसभापती), नयना पैलकर, लक्ष्मी पाळेकर, अनिता आंबुरे, वैशाली मोगरे, उषा चौधरी, वसुंधरा दुर्गे, रेश्मा अर्जुन पाठारे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !
– राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी