Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज छाननी नंतर जवळपास सर्वच ठिकाणच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मावळ तालुक्यात पंचायत समितीचे दहा गण आहेत. यापैकी नऊ गणांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचे उमेदवार असणार आहे, त्यातील सोमाटणे पंचायत समिती गणांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कारके यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला.
शनिवारी (दि. २६ ) उर्से गावात श्री पद्मावती माता मंदिरात श्रीफळ वाढवून सोमाटणे गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साहेबराव कारके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आदी मान्यवर, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिकांचा उत्साह आणि महायुतीवर असलेला विश्वास पाहता, विकासाच्या या लढाईत जनतेचा कौल स्पष्ट दिसत आहे., असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
तसेच, आपल्या भागाच्या शाश्वत विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या दोन्ही शिलेदारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार शेळके यांनी केले. पुढे माध्यमांशी बोलताना, साहेबराव कारके हे मावळ तालुक्यात पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारे उमेदवार ठरतील. सोबतच, साहेबराव कारके हे मावळ पंचायत समितीचे प्रथम उपसभापती होतील, असा शब्दही आमदार सुनील शेळके यांनी दिला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !
– राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी