हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे यांच्या ग्राम उत्थान कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम मावळ तालुक्यामधील मोरवे गावामध्ये घेण्यात आले.
मसाला बनवण्याचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उद्देश
ग्रामीण भागातील महिलांकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याची मागणी वाढत आहे आणि ते गावस्तरावर उपलब्ध नसल्यामुळे या प्रशिक्षणामुळे गावस्तरावर महिला व्यवसाय निर्मिती व जास्तीस्त जास्त उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे, तसेच महिलांच्या मसाला बनवण्याच्या पद्धतीत ज्ञानाची भर पडणार आहे. ( Spice making skills training program for women in Morwe village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर मसाला बनवण्याचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मावळ तालुक्यातील मोरवे गावातील 22 महिलांना मसाला बनवण्याचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. मसाला बनवण्याचे कौशल्य प्रशिक्षणास प्रशिक्षक शीतल वर्पे यांनी हे मसाला बनवण्याचे कौशल्य महिलांना शिकवले आहे. सदर प्रशिक्षण कालावधी हा एकदिवसीय होता.
मसाला बनवण्याचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून ओंकार कुलकर्णी, अभिजीत अब्दूले, सारिका शिंदे, रुपाली गोणते आणि पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून ओंकार कुलकर्णी यांनी मसाला बनवण्याचे प्रशिक्षणास सहभागी महिलांचे, गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– अपघाताची बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात टेम्पो उलटला
– मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला