Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज ( दि. २ मे ) जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल आज ( दि. २ मे ) जाहीर झाला. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी अधिक आहे. विभागनिहाय कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. सर्व विद्यार्थी दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचा निकाल mahahsscboard.in आणि अन्य अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात.
यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे, तर निकालात मुलींची 93.15 टक्केंसह बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 93.15% तर मुलांचा 86.80% इतका नोंदवला गेला आहे. तर विभागात कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी
– ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला चालना
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला


