Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे घरात कोणी नसल्याची संधी साधून चुलत भावाने कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (११ मे), सकाळी ६.०० ते दुपारी २.०० वाजण्याच्या दरम्यान मनोहरनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कर्नाटक राज्यातील भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी कामावर गेले असताना त्यांचा चुलत भाऊ घरी आला होता.
त्याने घरातील बेडरुममध्ये असलेल्या उघड्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून एक लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

