Dainik Maval News : मावळ तालुक्यात जमीन मोजणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेबड ओहळ येथे घडली. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीच्या मोजणीवरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी अंगावर धावून जात हाताने, काठीने आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या नाकाचे हाड आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडील आणि काका-काकींना जीवे मारण्याची धमकी दिली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता