व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत माय-लेकाचा मृत्यू, खासदार श्रीरंग बारणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

शनिवारी सकाळी खासदार श्रीरंग बारणे यांनी किरवली गावात जात सचिन बडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 24, 2022
in महाराष्ट्र
Karjat-Panvel-Railway-Accident

Photo : Jagdish Dagade


पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसऱ्या मार्गाचे काम करताना शुक्रवारी (23 डिसेंबर) ठेकेदारांनी निष्काळजीपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे किरवली गावातील मायलेकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. किरवली गावातील सचिन बडेकर आणि त्यांची आई देवका बडेकर यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज (शनिवार, 24 डिसेंबर) रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बडेकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ( Accident During Work On Karjat Panvel Railway Line Mother And Son Death From Kirwale Raigad MP Shrirang Barane Met Family Members )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शनिवारी सकाळी खासदार श्रीरंग बारणे यांनी किरवली गावात जात सचिन बडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला. बडेकर कुटुंबियांची भेट घेऊन खासदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सचिन महादू बडेकर आणि देवका महादु बडेकर यांना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे खासदार बारणे यांनी यावेळी संगितले आहे.

कर्जत चौक रस्त्यापासून साधारण वीस मीटर अंतरावर वावर्ले गावाजवळ हे ब्लास्टिंग करण्यात आले असून ब्लास्टिंग करताना कोणतीच काळजी न घेता आणि मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता ब्लास्टिंग केल्याने निष्पाप मायलेकाला जीव गमवावा लागला. ब्लास्टिंगमुळे 7 बाईकस्वार गंभीर जखमी झाले आहेत. ब्लास्टिंगमध्ये उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आल्याने दुकानदार देखील जखमी झाले असून दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी ट्रॅकच्या वरच्या बाजूला असलेला डंपरनेही पेट घेतला. डंपरच्या डिझेल टाकीचा आणि टायरचा स्फोट झाला. या सर्व घटनांची खासदार बारणे यांनी माहिती घेतली. प्रशासनाकडून मायतांच्या कुटुंबाला पुर्णपणे मदत केली जाईल, मी स्वतः प्रशासकीय अधिकारी, रेल्वे अधिकारी तसेच ठेकेदारशी बोललो आहे. प्रशासन बडेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची माहिती बारणे यांनी दिली आहे.

घटनास्थळावर खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ( Accident During Work On Karjat Panvel Railway Line Mother And Son Death From Kirwale Raigad MP Shrirang Barane Met Family Members )
(माहिती स्त्रोत – जगदीश दगडे, रायगड)

अधिक वाचा –

– नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या संकुलातील शाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
– सावधान..! लोणावळ्यात येत असाल तर मास्क लावा आणि कोरोना नियमांचे पालन करा, अन्यथा…
– थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना सुचना


Previous Post

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या संकुलातील शाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Next Post

मावळ राष्ट्रवादीकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामसदस्यांचा सत्कार । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NCP-Sunil-Shelke

मावळ राष्ट्रवादीकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामसदस्यांचा सत्कार । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.