नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाची सुरुवात… या अनुषंगाने मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या या तीनही इव्हेंटचा आनंद साजरा करण्यासाठी देशभरातून आणि अगदी विदेशातूनही पर्यटक लोणावळा आणि परिसरात येत असतात. परंतू, सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची जगभर असलेली धास्ती पाहता आणि चीनमध्ये पुन्हा झालेला प्रादुर्भाव पाहता, केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोणावळा प्रशासनानेही खबरदारी म्हणून पर्यटकांना काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ( Lonavala City CEO Pandit Patil Appeal To Tourists To Wear Mask And Follow Corona Rules In Between Christmas Thirty First And New Year Celebration )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“कोरोना साथरोगाचा प्रसार काही देशांमध्ये पुन्हा वाढू लागला आहे. भारतातही काही प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी विविध भागातून पर्यटक येत असतात. गर्दी होण्याची देखील शक्यता असल्याने आपल्यामुळे इतरांना किंवा इतरांपासून आपल्याला कोरोना साथरोगाचा संसर्ग होऊ नये याकरिता लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्थानिक व्यावसायकांनी देखील संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, हॉटेल आणि बंगलो व्यावसायिकांनी येणाऱ्या पर्यटकांना मास्क आणि सॅनिटायझर वापराबाबत सूचित करावे,” असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडीत पाटील यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना सुचना
– पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना : मंत्री शंभूराज देसाई