व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा

महाविद्यालयासाठी क्रीडा संकुलामध्ये तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पुढील दोन वर्षांत स्वतंत्र इमारतीचा आराखडा पूर्ण करण्याचा मानस नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 14, 2026
in लोकल, शहर
Talegaon Dabhade Municipal Council announces junior college Opportunity for higher secondary education

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि शिक्षण मंडळातर्फे आगामी शैक्षणिक वर्षापासून कला आणि वाणिज्य शाखांचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयात प्रत्येक शाखेसाठी ८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिक्षण समिती सभापती भारती धोत्रे, समिती सदस्य तसेच प्रभारी प्राचार्य वर्षा थोरात नगरसेविका शोभा परदेशी, स्नेहा खांडगे, सोनाली दरेकर, ऋतुजा भगत आदी उपस्थित होत्या. शासनाने लागू केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोन, मारुती मंदिर चौक येथे विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

महाविद्यालयासाठी क्रीडा संकुलामध्ये तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पुढील दोन वर्षांत स्वतंत्र इमारतीचा आराखडा पूर्ण करण्याचा मानस नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सीएसआर निधीतून विविध कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सांगितले.

तळेगाव परिसरात वाढत्या शैक्षणिक गरजा आणि खासगी शिक्षणाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या या निर्णयाचे पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी क्रीडा, कला, स्पोकन इंग्लिश आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याने आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे.

महाविद्यालयासाठी क्रीडा संकुलात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी दोन वर्षांत नगर परिषदेच्या महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदाच्या बजेटमध्ये २७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सीएसआर फंडातून अनेक कंपन्या आणि एनजीओ यांची मदत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सांगितले.

नगर परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला, स्पोकन इंग्लिश आदी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती सिद्ध केली आहे. उच्च विद्याविभूषित शिक्षक, अत्याधुनिक प्रयोगशाळा, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य आणि सकस आहार या शाळांमधील १७०० विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देत आहेत. आता कनिष्ठ महाविद्यालयामुळे १६० विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळणार आहे, असे शिक्षण समिती सभापती भारती धोत्रे यांनी सांगितले.

नगर परिषद महाविद्यालयामुळे आर्थिकदृष्ट्या उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. सर्वांना येथे मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत असल्याने पालकांनीही नगर परिषद महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रभारी प्राचार्य वर्षा थोरात यांनी आवाहन केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव शहरातील कटारिया कुटुंबाचा समाजासमोर आदर्श ; तरुण मुलाच्या निधनानंतर अवयवदानातून ४ जणांना जीवनदान

Next Post

पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
school

पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.