Dainik Maval News : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल-दुरुस्तीचे काम तसेच मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.
वाहनचालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीदरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद
