भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त (रविवार, 25 डिसेंबर) मुळशी तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींना ड्रेस, स्वेटर आणि खाऊचे वाटप करण्यात आले. सदस्य, ग्रामपंचायत पौड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजपाचे सोशल मीडिया संयोजक प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ( Distribution Of Clothes And Food To Tribal Children In Mulshi Pune On Occasion Of Atal Bihari Vajpayee Birth Anniversary )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमासाठी झील स्कुलचे संस्थापक विक्रांत वाल्हेकर यांजकडून ड्रेस देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन प्रमोद शेलार यांनी केले होते. तालुका आध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी अटलजींचे विचाराचे आपण अनुकरण करायला हवे, असे यावेळी सांगितले. तसेच तसेच आदिवासी बांधवासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रमही पाहण्यात आला. यावेळी प्रमोद शेलार यांनी आदिवासी वस्तीतील प्रत्येक घराला वीज जोडणी आणि वस्तीपर्यंत पक्का रस्ता करण्यासाठी प्रयत्न करु, असा मानस व्यक्त केला.
View this post on Instagram
यावेळी विनायक ठोंबरे (अध्यक्ष, भाजपा) विष्णूभाऊ वाल्हेकर (संस्थापक, झील स्कूल) अशोक सुर्वे (अध्यक्ष, भ. वि. आघाडी) मंदार पावसकर (उपाध्यक्ष, युवा मोर्चा) तसेच ह.भ.प. विठ्ठल महाराज पांडे, विठ्ल महाराज दहिभाते, माय होम इंडिया पुरस्कार विजेते अनिजी वाघमारे, गंगणे सर, अनिल घोडके सर, अग्निहोत्री मँडम, प्रशांत वाळंज, रोहन वाव्हळ, अक्षय इप्ते, अवधूत बाप्ते सचिन आकरे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगावात ‘मल्हार रेसिडेन्सी’मध्ये ख्रिसमस साजरा, बालगोपाळांनी पथनाट्यातून टोचले प्रौढांचे कान
– शिवसेना नेते, आमदार उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील संपूर्ण भाषण, वाचा जसेच्या तसे