व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार; धरणग्रस्त, पुनर्वसित गावे, नदीकाठ परिसरातील विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 26, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून व उपस्थितीत पुणे येथे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. तालुक्यातील धरणग्रस्त, पुनर्वसित गावे तसेच नदीकाठच्या परिसरातील विकासकामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

पवना धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांमध्ये आवश्यक पायाभूत व भौतिक विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच शिरे व शेटेवाडी येथील पुनर्वसनाशी संबंधित सुधारणांबाबत वेगाने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. पवना व आंद्रा धरण परिसरात आवश्यक त्या ठिकाणी बुडीत बंधारे उभारण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

इंद्रायणी व पवना नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या धोक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पूर संरक्षण भिंती उभारण्याची आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली. पुनर्वसित गावांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा दर्जेदार आणि टिकाऊ असाव्यात, तसेच विकासकामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मावळ तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कामे केवळ मंजूर होणे पुरेसे नसून ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे, यावर आमदार शेळके यांनी बैठकीत भर दिला. प्रत्येक विकासकामाचा बारकाईने आढावा घेत त्यातील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

धरणग्रस्त आणि पुनर्वसित नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाव्यात, नदीकाठच्या गावांचे पूरस्थितीपासून संरक्षण व्हावे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा यासाठी आमदार सुनील शेळके यांचा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांच्या हिताची ठरावीत, यासाठी यापुढेही बारकाईने लक्ष देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

Next Post

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका 'ओम्या' काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, 'भारतकेसरी ओम्या' बैलाचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.